बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितांच्या पुस्तकावरून वाद; SP कॉलेज परिसराला छावणीचं स्वरुप

agitation against publication of colonel purohit the man battered book in sp college pune
agitation against publication of colonel purohit the man battered book in sp college pune

पुणे : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम एस पी कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान या पुस्तकाविरोधात पुण्यात पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या असून या पुस्तकाच्या प्रकाशनाला जोरदार विरोध केला जात आहे.

लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या 'द मॅन बेट्रेड' ( the man battered) या पुस्तक प्रकाशनाला पुरोगामी विचारांच्या संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. पुस्तकाचे प्रकाशन आपल्या महाविद्यालयात होऊ देऊ नका अशी विनंती देखील या कार्यकर्त्यांनी एस पी कॉलेजच्या प्राचार्यांकडे केली होती.

काय होतोय विरोध?

कर्नल पुरोहित 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहेत. ज्यात 6 लोकांचा मृत्यू झाला होता तसेच अनेकजण जखमी झाले होते. असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

दरम्यान पुस्तक प्रकाशन करु नये अशी विनंती आम्ही केली असून पुस्तक प्रकाशन होऊ देणारं नाही असे पुरोगामी संघटनांकडून सांगण्यात आलं. तसेच आंदोलनाचा इशारा देखील पुरोगामी विचारसरणीच्या संघटनांनी दिला होता. स्मिता मिश्रा लिखित या पुस्तकाचे जयंत उमराणीकर, सत्यपाल सिंग यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

agitation against publication of colonel purohit the man battered book in sp college pune
Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या, कारण…

यावेळी एस पी कॉलेज पासून जवळ असलेल्या एका ठिकाणी पुरोगामी संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले. या प्रकाशन कार्यक्रमासाठी एस पी कॉलेज बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर एस पी कॉलेज परिसराला पोलिसांच्या छावणी चे स्वरूप आले आहे.

agitation against publication of colonel purohit the man battered book in sp college pune
Ajit Pawar : विरोधकांचा सरकारी चहापानावर बहिष्कार, अजित पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले..

विरोध होत असला तरीही एस पी कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार अशी भूमिका घेण्यात आल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शरद पोंक्षे यांची देखील उपस्थिती असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com