esakal | बारामतीत नगरपालिकेच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक करणार गांधीगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati-Corporation

बारामती येथील नगरपालिकेच्या धोरणाच्या निषेधार्थ बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनी गांधीगिरी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी (ता. 6) क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने काम बंद आंदोलन करत आत्मचिंतन करणार असल्याचे जाहीर केले आहे. क्रेडाईचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे व सचिव राहुल खाटमोडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

बारामतीत नगरपालिकेच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक करणार गांधीगिरी

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - येथील नगरपालिकेच्या धोरणाच्या निषेधार्थ बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनी गांधीगिरी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी (ता. 6) क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने काम बंद आंदोलन करत आत्मचिंतन करणार असल्याचे जाहीर केले आहे. क्रेडाईचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे व सचिव राहुल खाटमोडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यात बांधकाम व्यावसायिकांसह इतरांच्याही बांधकाम मंजूरीच्या प्रस्तावावर नगरपालिका प्रशासन निर्णय घेत नाही, अनेक प्रस्ताव दोनशे दिवसांहून अधिक काळ रेंगाळले आहेत. या मुळे नगरपालिकेच्या कररुपी महसूलावर परिणाम झाला आहे, बांधकाम व्यावसायिकांचे व पुरवठादार, कंत्राटदार, मजूरवर्गाचेही अतोनात नुकसान होत आहे. 

पुण्याचे आलाप दोशी यांना ‘मिशिगन विद्यापीठा’चा पुरस्कार

कमी झालेले मुद्रांक शुल्क व बँकांनी कमी केलेले व्याजदर याचा ग्राहक व व्यावसायिक दोघांनाही नगरपालिकेच्या धोरणामुळे लाभ घेता आलेला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत मार्च 2021 पर्यंतच असल्याने त्याचाही लाभ मिळणार नाही. परवानगीच मिळत नसल्याने नाईलाजाने लोक अनधिकृत बांधकामाकडेही वळू शकतात. दुसरीकडे नोंदणी कार्यालयात सातत्याने सर्व्हर डाऊन असतो त्याचाही त्रास होतो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा झालेला सुळसुळाट याचाही व्यावसायिकांना कमालीचा त्रास होत आहे.

धक्कादायक : जुन्नर तालुक्यात भावानेच भावाला ट्रॅक्टरखाली चिरडलं 

या परिस्थिताला कंटाळून कोणी आत्महत्येचे पाऊल उचलल्यास त्याला कोण जबाबदार, असा सवालही या निवेदनात करण्यात आला आहे. सर्वच बांधकाम व्यावसायिकांनी यात सहभागी होण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. 

माहिती हवीय...लेखी अर्ज द्या...
या संदर्भात नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक नगररचनाकार रोहित पाटील यांच्याकडे किती प्रकरणे प्रलंबित आहे याची माहिती मागण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गेले असता, त्यांनी प्रारंभी माझ्याकडे माहिती लगेच उपलब्ध नाही, आणि तुम्हाला माहिती हवी असेल तर लेखी अर्ज करा, असे सांगितल्यावर पत्रकारही अवाक झाले.

Edited By - Prashant Patil