भगवे वादळ चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने आंदोलन

डॉ. संदेश शहा
Tuesday, 11 August 2020

भगवे वादळ चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने बँक व फायनान्स कंपन्यांचे कर्ज एक वर्षासाठी स्थगित करावे. शैक्षणिक सत्र २०२१ -२०२१ हे शासकीय अनुदानातून पूर्णतः पासिंग करुन देण्यात यावे, जोपर्यंत अनलॉक पूर्णतः संपत नाही, तोपर्यंत प्रत्येक बस चालक, मालकास, दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्यावे .या प्रमुख मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत इंदापूर डोंगराई सर्कलजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इंदापूर - भगवे वादळ चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने बँक व फायनान्स कंपन्यांचे कर्ज एक वर्षासाठी स्थगित करावे. शैक्षणिक सत्र २०२१ -२०२१ हे शासकीय अनुदानातून पूर्णतः पासिंग करुन देण्यात यावे, जोपर्यंत अनलॉक पूर्णतः संपत नाही, तोपर्यंत प्रत्येक बस चालक, मालकास, दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्यावे. या प्रमुख मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत इंदापूर डोंगराई सर्कलजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे इंदापूर व माळशिरस तालुका संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत वाघे, इंदापूर तालुकाध्यक्ष महादेव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नायब तहसिलदार श्रीमती शुभांगी आधटराव यांना संघटनेच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी लक्ष्मीकांत वाघे म्हणाले, कोरोना महामारी लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात शाळा, विद्यालये अनिश्चित काळबंदअसल्याने  बस चालक मालक व त्यांच्या कुटुबियांची उपासमार होत आहे.

त्यामुळे उपरोक्त मागण्या बरोबरच जोपर्यंत शाळा सुरु होत नाहीत, तोपर्यंत एस.टी.बसथांब्या पासून १०० किलोमीटर अंतरापर्यंत स्कूल बसने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात यावी, स्कूलबस नियमावलीत फेरबदल करण्यापूर्वी संघटना पदाधिकाऱ्यांना शासनाने विश्वासात घ्यावे. आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले होते. मागण्यांची पूर्तता झाली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नाईलाजाने हे आंदोलन करावे लागले. 

दादासाहेब जगताप,कुमार गायकवाड, अतुल सुळ, पिंटू घोगरे, अतुल ढोले, भगवान घोगरे, सिध्दनाथ जगदाळे, बबन पवार हे आंदोलनात सहभागी झाले होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation by Driver Ower Student Transport Organisation