वाहनांना शुल्क आकारल्यास काम बंद आंदोलन; कामगार संघटनेचं पुणे बाजार समितीला निवेदन

वाहनांना शुल्क आकारल्यास काम बंद आंदोलन; कामगार संघटनेचं पुणे बाजार समितीला निवेदन

मार्केट यार्ड : पुणे कृषी बाजार समिती प्रशासनाकडून मंगळवारपासून बाजारात वाहनतळ निर्माण केलेल्या वाहनांकडून पार्किंग शुल्क आकारण्यात येणार आहे. दुसरीकडे टेम्पो पार्किंगसाठी जागा, ओळखपत्र अशा सुविधा न देता केवळ त्यांच्याकडून पार्किंग शुल्क आकारण्याला आमचा विरोध आहे. प्रशासनाने हा निर्णय रद्द न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने बाजार समिती प्रशासनाला सोमवारी दिला. ( agitation if vehicles are charged Statement of the trade union to the market committee)

सोमवारी बाजारातील गणेश मंदिरात कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत पार्किंग शुल्क न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी भरणार्‍या टोळ्या दादागिरी करून पैशांची वसूली करीत असल्याच्या आरोपामुळे पार्किंग शुल्काचा निर्णय घेतला असल्याचे बाजार समिती प्रशासन सांगत आहेत. मात्र एखादे असे उदाहरण घडले असले, तर प्रशासनाने त्यावर जरूर कारवाई करावी. लायसन्सही रद्द करावे. तसेच बाजारात विनाकारक अधिक काळ थांबणार्‍या टेम्पोवर कारवाई करण्याचे बैठकीत ठरले होते. मात्र त्यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. उलट पार्किंग शुल्क आकारण्याबाबत निवीदा काढले जाते. हे चुकीचे असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.

वाहनांना शुल्क आकारल्यास काम बंद आंदोलन; कामगार संघटनेचं पुणे बाजार समितीला निवेदन
पुणे महापालिकेचे लसीकरण उद्या मंगळवारी राहणार बंद

कोरोनामुळे टोम्पो चालकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचंना मिळणारी भाडे कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत टेम्पोला 100 ते 200 रूपये शुल्क आकारल्यास त्यांना भाडे परवडणार नाहीत. परिणामी त्यांना भाडेवाढ करावी लागेल. महागाई वाढेल, त्याचा ग्राहकांवर ताण पडेल. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने पार्किंग शुल्क वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणीही हमाल पंचायतीचे गो. मा. मेंगडे, कामगार संघटनेचे किसन काळे, टेम्पो पंचायतीचे संतोष नांगरे तसेच तोलणार संघटन ा व महाराष्ट्र टेम्पो संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com