
विश्रांतवाडी : सारथी संस्थेतील तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठवून तारादूतांना नियुक्त्या द्याव्यात व या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून प्रकल्पाला गती द्यावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातील तारादूतांनी पुणे येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गेले पाच दिवस हे आंदोलन चालू असून, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. थंडीची पर्वा न करता आंदोलक तेथे ठिय्या मांडून आहेत.
यावेळी शासनाने सारथी संस्थेला स्वायत्तता देताना आर्टिकल 25 च्या माध्यमातून निर्णय घेण्याचे अधिकार काढल्याचे व्यवस्थापकीय अधिकारी काकडे यांनी सांगितले आहे. 7 डिसेंबर 2020 रोजी दुपारी सारथीच्या संचालक मंडळासोबत पोलिस प्रशासनाने बैठक घडवून आणली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक धनंजय जाधव, सचिन अडेकर, गणेश मापारी, आंदोलनकर्ते तारादूत, अशोक खवणे, सदाशिव भुतेकर, शीतल आटोळे, प्रियांका पुरी यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी सारथी संस्था अध्यक्ष अजित निंबाळकर, सदस्य मधुकर कोकाटे, सदस्य उमाकांत दांगट, सारथी व्यवस्थापकीय अधिकारी अशोक काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. निंबाळकर यांनी सारथी संस्थेला स्वायत्तता पूर्ण नाही. त्यामुळे आम्ही तारादूतांबाबतीत निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याबाबत सामाजिक कार्यकर्ते धनंजय जाधव यांनी सांगितले की, मराठा समाजातील तरुणांसाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. सारथी संस्थेचा महाराष्ट्रभरामध्ये प्रचार-प्रसारासाठी, त्याचबरोबर मराठा बहुजन समाजासाठी अनेक योजना आहेत. त्या सारथी संस्थेतील तारादूतांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पोहोचविले जाते. परंतु यांना अकरा महिन्यांसाठी कामावर निवड झाली असतानादेखील कामावरून कमी करण्यात आले. या सर्वांना कामावर परत घ्यावे म्हणून सारथी संस्थेच्या समोर तारादूत ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आम्ही सहभागी आहोत.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.