‘अ‍ॅग्री विथ कल्चर शरद पवार’ पुस्तक प्रकाशित

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कृषी क्षेत्रातील योगदान या विषयावर आधारित ‘ॲग्री विथ कल्चर शरद पवार’ हे पुस्तक पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक डॉ. वर्षा शिवले यांनी लिहिले.
Agri with Culture
Agri with CultureSakal

पुणे - माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे कृषी क्षेत्रातील योगदान या विषयावर आधारित ‘ॲग्री विथ कल्चर शरद पवार’ (Agri with Culture Sharad Pawar) हे पुस्तक (Book) पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक डॉ. वर्षा शिवले (Dr Varsha Shivale) यांनी लिहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (ता.७) मुंबईत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. (Agri With Culture Sharad Pawar Book Publish)

या पुस्तकात पवार यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल आणि त्यांनी राबविलेल्या योजनांबद्दल माहिती देण्यात आली आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि लेखिका वर्षा शिवले उपस्थित होत्या. देशाचे कृषी मंत्रिपद सलग दहा वर्षे सांभाळणारे पवार हे देशातील एकमेव नेते आहेत. या पदावर कार्यरत असताना पवार यांनी कृषी संशोधनावर विशेष भर दिला आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. पवार यांनी कृषी क्षेत्रात केलेले काम हे भारताच्या इतिहासातील कृषी समाज व्यवस्थेमधील सोनेरी पान असल्याचे मत पुस्तक प्रकाशनप्रसंगी विविध वक्त्यांनी व्यक्त केले.

पवार यांच्या निर्णयामुळे झालेल्या फळबाग क्रांती, दूध उत्पादन आणि सहकारी साखर कारखान्यांसह सहकार क्षेत्रात झालेले बदल आणि शेतकऱ्यांना झालेले फायदे आदींचा आढावा या पुस्तकाच्या माध्यमातून घेतला असल्याचे डॉ. वर्षा शिवले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com