दहिवडीमध्ये ‘अ‍ॅग्रीबिझनेस स्टार्टअप’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात

दहिवडीमध्ये ‘अ‍ॅग्रीबिझनेस स्टार्टअप’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात

Published on

दहिवडीत ‘अ‍ॅग्रिबिझनेस स्टार्टअप’वर कार्यशाळा

दहिवडी, ता. २५ : येथील दहिवडी कॉलेजमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, लाईवलीहूड बिझनेस इनक्युबेशन सेंटर, उद्योजकता कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अ‍ॅग्रिबिझनेस स्टार्टअप : शेतीपासून बाजारपेठेपर्यंत’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात झाली.
पहिल्या सत्रात गोंदवले बुद्रुक येथील संजय नवले यांनी उसापासून गुळनिर्मिती प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात बारामतीच्या रोहिणी चौधार यांनी ‘सोया मिल्क व टोफू फ्युजन प्रक्रिया’विषयी माहिती दिली.  अंतिम सत्रात माढा येथील प्रगत शेतकरी व द्राक्षबागायतदार नितीन कापसे यांनी ‘द्राक्ष उत्पादन व मनुका, बेदाना उत्पादन प्रक्रिया’ यावर मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योगातील संधी व आव्हाने स्पष्ट केली.
प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी विद्यार्थ्यांनी कृषी आधारित उद्योग क्षेत्राचा अभ्यास करून नवनवीन संधी शोधाव्यात, असे आवाहन केले. यावेळी प्रश्नोत्तर व चर्चासत्र झाले.
कार्यक्रमास उपप्राचार्या डॉ. मीरा देठे, लाईवलीहूड बिझनेस इनक्युबेशन सेंटर समन्वयक डॉ. मारुती लुबाळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पीएम-उषा समन्वयक डॉ. सुधीर कुंभार, पत्रकार रूपेश कदम, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. कृषी आधारित स्टार्टअपविषयी नवा दृष्टिकोन मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रा. सोमनाथ गायकवाड यांनी स्वागत केले.   वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नीलेश म्हेत्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. कांचन गुळीक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शुभम चौरसिया यांनी आभार मानले.

.‌......


B07313
दहिवडी : ‘अ‍ॅग्रिबिझनेस स्टार्टअप : शेतीपासून बाजारपेठे पर्यंत’ या विषयावरील कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मान्यवर, विद्यार्थी.
............................................

Marathi News Esakal
www.esakal.com