Smart Farming : उसाचे एकरी १०४ ते १५० टनांपर्यंत उत्पादन; ‘एआय’मुळे उत्पादनात वाढ
AI In Farming : बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशील ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे उत्पादनात ४०% वाढ झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे खर्च व पाणी बचतीसह एकरी १०४ ते १५० टन ऊस उत्पादन झाले आहे.
बारामती : बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) प्रभावी वापराचा देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे.