केंद्रीय अर्थसंकल्पावर आमदार नारायण पाटील यांची प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थसंकल्पावर आमदार नारायण पाटील यांची प्रतिक्रिया

Published on

अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण भागासाठी निगडीत असलेल्या अनेक चांगल्या योजनांना वाढीव निधी राखून ठेवून बळकटी देण्यात आली आहे. तसेच शेती ओलिताखाली यावी म्हणून उपसा सिंचन योजनांनाही राज्यांना ठराविक आर्थिक मदत देण्याचे धोरण पुढे चालू ठेवले आहे. यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातील विशेषतः करमाळा तालुक्यातील उत्तर भागासाठी महत्वाची वरदायिनी ठरू पाहणाऱ्या नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन यौजनेबाबतीत राज्य सरकारही सकारात्मक राहू शकणार आहे. ही बाब शेतकऱ्यांना सुखावणारी आहे. बाकी ग्रामीण भागातील मतदार संघात मोठे उद्योग निर्माण होऊन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे यासाठी आणखी ठाम धोरणात्मक निर्णय घेतले गेले पाहिजेत.
- नारायण पाटील, आमदार, करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com