

ARM26B03615
दहिगावने : कृषी विज्ञान केंद्राला उत्कृष्ट कार्य कृषी विज्ञान केंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांचा सत्कार करताना माजी आमदार चंद्रशेखर घुले, काकासाहेब नरवडे, बबन भुसारी, अनिल शेवाळे, रवींद्र मोटे.
दहिगावने कृषी केंद्राचा पुरस्काराने सन्मान
शेवगाव, ता. ४ : तालुक्यातील दहिगावने येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला उत्कृष्ट कार्य कृषी विज्ञान केंद्र पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांचा सत्कार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्राचे कामकाज अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी पद्धतीने सुरू आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत अटारी, झोन-८ यांच्या वतीने महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यांतील एकूण ८२ कृषी विज्ञान केंद्रांचा नववी वार्षिक विभागीय कार्यशाळा नुकतीच आय. सी. ए. आर. अटारी (जि. पुणे) येथे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्रास २०२५ मधील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार डॉ. कौशिक यांनी मोहनपूर (पश्चिम बंगाल) येथील बिधानचंद्र कृषी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. अधिकारी यांच्या हस्ते स्वीकारला. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच डॉ. क्षितिज घुले पाटील, सर्व विश्वस्त मंडळ, संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे यांनी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व सर्व स्टाफचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.