आसू - उद्यानविद्या महाविद्यालय व  कृषि महाविद्यालय, फलटण येथे कृषि विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

आसू - उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे कृषि विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Published on

फलटणला कृषी विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद

उद्यानविद्या- कृषी महाविद्यालयातर्फे आयाेजन; संशोधनपर प्रकल्प

आसू, ता. २२ : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल येथील सांस्कृतिक सभागृहात कृषी विज्ञान प्रदर्शन उत्साहात झाले.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांच्या हस्ते कृषी विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण उपस्थित होते.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कृषीतील आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स शेती, पॉली हाऊस तंत्रज्ञान, आधुनिक फळ व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, हवामान आधारित शेती, हायड्रोपोनिक्स, ड्रोन तंत्रज्ञान, मुक्त संचार गोठा पद्धत, पीक काढणी व पश्चात काढणी यंत्रे, सूक्ष्म पीक सिंचन पद्धती, पीक बाजारभाव, शेती तंत्रज्ञान मोबाईल ॲप, हवामान आधारित भविष्यातील शेती तसेच आधुनिक कृषी उत्पन्न पद्धती, शेती यांत्रिकीकरण यांसारख्या विविध विषयांवर प्रात्यक्षिके व माहितीफलक सादर केले. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विविध मॉडेल्स, प्रात्यक्षिके व संशोधनावर आधारित प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषीतील संशोधनाची आवड निर्माण झाली. शेतकरी व नागरिकांना आधुनिक शेतीविषयक प्रत्यक्ष पाहण्याची व माहितीची संधी मिळाली.
प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. एस. आर. कश्यप, कृषी वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. ए. एस. रासकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास प्राध्यापक, शेतकरी, लघुउद्योजक, कृषी निविष्ठा विक्रेते, महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले हाेते.

B02529
फलटण : कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना अरविंद निकम. त्या वेळी डॉ. एस. डी. निंबाळकर, डॉ. यू. डी. चव्हाण आदी.
.......................................,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com