शेतकऱ्यांच्या विकासाचा वसा घेतलेले कृषी पर्यवेक्षक

शेतकऱ्यांच्या विकासाचा वसा घेतलेले कृषी पर्यवेक्षक

शेतकऱ्यांच्या विकासाचा वसा घेतलेले कृषी पर्यवेक्षक

सोलापूर जिल्ह्यातील आढेगाव येथील शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या मुलाने खस्ता खात, अपार कष्ट उपसत जीवनात शिक्षणाच्या जोरावर उज्ज्वल यश मिळविले आणि कृषी पदवी संपादन करून शेतकऱ्यांच्या विकासाचा वसा हाती घेतला. यामुळे तानाजी गायकवाड यांच्यासारख्या उत्कृष्ट कृषी पर्यवेक्षकास नोकरीतील कार्यतत्परतेमुळे २०१५-१६ मध्ये उत्कृष्ट कृषी पर्यवेक्षक पुरस्कार विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले तर सन २०२३-२०२४ मध्ये जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तानाजी गायकवाड, कृषी पर्यवेक्षक


तानाजी गायकवाड यांचे आई-वडील शेतकरी व मजुरी करणारे. त्यांचा घराचा व्यवसाय पारंपरिक शेती. ते पाच जण भाऊ. तानाजी हे घरात सर्वांत लहान. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यावेळी त्यांचे तीन भाऊ कामानिमित्त पुणे येथे राहत होते. सर्व भावांनी तानाजी यांना एकच सांगितले, की ‘आम्हाला शिकता आले नाही. पण तू शिक्षण घे.’ त्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तानाजी यांना त्यांच्या तीन नंबरचे भाऊ जनार्दन हे इंदापूर एसटी डेपो येथे वॉचमन पदावर काम करत होते. यांनी तानाजी यांना येथील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथेच तानाजी यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांना इंग्लिश विषयात १०० पैकी ७८ गुण मिळाले. त्यामुळे सर्वजण आनंदात होते. मुलगा पुढे जाऊन नाव काढणार असे सर्व घरच्यांना विश्वास वाटू लागला. त्यामुळे पुढील ११ आणि १२ वी चे शिक्षण इंदापूर येथेच केले. त्यावेळी तानाजी यांचा कॉलेजमध्ये ३ रा नंबर आला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयात नंबर लागला. भाऊ जनार्दन यांनी तानाजी यांच्या शिक्षणासाठी पुण्यात बदली करून घेतली आणि तानाजी यांचा जेवणाचा प्रश्न सुटला.

फळबाग लागवड, मृदा संवर्धन कामास प्राधान्य
तानाजी गायकवाड यांनी १९८५ ते १९८९ मध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यात फर्स्ट क्लास मिळवून एमपीएससी करत करत नोकरीचा शोध सुरू झाला. त्या दरम्यान मामाच्या मुलीसोबत लग्न सोहळा झाला. नोकरीच्या शोधात असताना १९८९ मध्ये कृषी सहायक म्हणून कामावर ते कर्जत जिल्हा नगर याठिकाणी रुजू झाले. पाच वर्षे कृषी सहायक म्हणून काम करून सोलापूर जिल्ह्यात त्यांची बदली झाली. सोलापूर येथे उत्तर सोलापूर येथे १० वर्ष नोकरी केली. या दरम्यान शेतकऱ्यांना फळबाग लागवड, मृदा संवर्धन कामे ठिबक सिंचन अशी सर्व प्रकारची कामांना शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राधान्य दिले. त्यानंतर अक्कलकोट येथे २००३ मध्ये बदली झाली. दक्षिण सोलापूर येथे २००५ ला बदली झाली. तर २००६ मध्ये मोहोळ येथे बदली झाल्यानंतर या ठिकाणी पाच वर्षे सेवा बजावली. त्यानंतर गायकवाड यांची २०११ मध्ये पुणे जिल्ह्यातील दुर्गम डोंगरी वेल्हे तालुक्यामध्ये बढती होऊन ते ‘कृषी पर्यवेक्षक’ झाले.

कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन
कामाच्या अनुभवाच्या जोरावर गायकवाड यांनी तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला तसेच शेतामध्ये विविध प्रयोग केल्याने भात शेतामध्ये विक्रमी उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तालुक्यातील रुळे गावातील शेतकरी चिंतामण तिडके यांना कृषी कर्मन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज
तानाजी गायकवाड यांना दोन मुली असून दोघींचेही लग्न झाले असून, दोघीही उच्च शिक्षित आहेत. दरम्यान, ३१ मे २०२५ रोजी तानाजी गायकवाड निवृत्त होत आहेत. तानाजी गायकवाड यांनी त्यांच्या आयुष्यातील खस्ता, कष्ट यांचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे गायकवाड यांच्या संपूर्ण जीवन संघर्षावरून दिसून येत आहे.

02399, 02402

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com