अर्थसंकल्प प्रतिक्रिया

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

Published on

SLC26B28025
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रासाठी तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन धोरणांचा उल्लेख आहे. मात्र शेतकऱ्यांच्या तातडीच्या आर्थिक अडचणींवर ठोस उपाय दिसत नाहीत. दर घसरण, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरता यावर उपाययोजना अपेक्षित असताना अर्थसंकल्पात प्रत्यक्ष आर्थिक दिलासा अपुरा आहे. साखरेबाबत ठोस धोरण अद्याप अर्थसंकल्पात दिसून आले नाही, यामुळे ऊस उत्पादकांची निराशा झाली आहे. कृषी आयात निर्यात धोरणाबाबतही या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना दिसून आल्या नाहीत.
- गोवर्धन ननवरे, शेतकरी, बीबी दारफळ.

SLC26B28026
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रासाठी विविध धोरणात्मक घोषणा करण्यात आल्या असून त्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काही मूलभूत आणि तातडीच्या प्रश्नांवर अधिक ठोस उपाय अपेक्षित होते. दरवर्षी कांद्याच्या दरात मोठी चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येतो.
कांद्याच्या साठवणूक, प्रक्रिया, दर स्थिरीकरणासाठी विशेष योजना, कमी खर्चाची गोडाऊन व्यवस्था तसेच एफपीओसाठी सुलभ कार्यभांडवल कर्जाची तरतूद झाली असती, तर या अर्थसंकल्पाचा लाभ अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोचला असता.
- संदीप गुंड, व्यवस्थापकीय संचालक, हॉर्टिमॅक्स फार्मर्स प्रोडूसर कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com