Pune Agriculture College: फिल्टरमध्ये करंट उतरला, बीडच्या विद्यार्थ्याचा पुण्यात मृत्यू; कृषी महाविद्यालयातील घटना

Student Death at Pune Agriculture College: चैतन्य हा कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी होता. सध्या तो एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयीन काळात तो ‘ई मेस’चा कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होता.
krushi mahavidyalaya pune

krushi mahavidyalaya pune

esakal

Updated on

Pune Latest News: येथील कृषी महाविद्यालयातील मेसमधील फिल्टरमुळे लागलेल्या विजेच्या तीव्र धक्क्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. १४ तारखेला रात्री ही घटना घडली असून त्यानंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याची प्राणज्योत मालवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com