
पुणे : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क ३० सप्टेंबरपर्यंत काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या कापसाची काढणी आता सुरू झाल्याने विक्रमी आयात होऊन देशात साठा वाढणार आहे. परिणामी, देशात कापसाचा पुरवठा वाढून नव्या हंगामातही भाव दबावात राहण्याची शक्यता आहे.