
पुणे : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने कृषी महाविद्यालयांत गुंतवणूक केली आहे, मात्र हा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असल्याने त्या तयारीसाठी विद्यार्थी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतात. येथून पदवी घेतलेली मुले-मुली शेतीकडे जात नाहीत, हा चिंतेचा विषय आहे,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.