अधिका-यांनी कामावर लक्ष ठेवून जनतेला न्याय द्यावा - दिलीप वळसे पाटील

घोडेगाव तालुक्यामध्ये खते बी-बियाणे यांचा तुटवडा होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Agriculture Department ensure that no shortage of fertilizers and seeds Dilip Walse Patil pune
Agriculture Department ensure that no shortage of fertilizers and seeds Dilip Walse Patil punesakal

घोडेगाव : तालुक्यामध्ये खते बी-बियाणे यांचा तुटवडा होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यावधींची कामे सुरू आहेत ही कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून लक्ष देऊन काम करून घ्यावी अशा सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. घोडेगाव( ता आंबेगाव) येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित सर्व खात्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विदयुत विभाग, कृषी विभाग, पोलीस प्रशासन, कुकडी प्रकल्प, तालुका कृषी विभाग आदि विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, विदयुत विभाग उपकार्यकारी अधिकारी शैलेश गिते, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्षन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, लहु थाटे, भिमाशंकर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे, शरद बॅंक संचालक सुदामराव काळे, रूपाली झोडगे, सरपंच क्रांती गाढवे आदि अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोटयावधी रूपयांची विकास कामे चालू आहे. परंतु संबंधित कामे चांगल्या पध्दतीने होत नाही. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या तरी संबंधितांवर कारवाई आपल्या विभागाकडून होत नाही. त्यामुळे संबंधित चालू असलेल्या कामांचा दर्जा सुधारला नाही तर मी स्वतः तक्रार करेल, असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला.दुष्काळग्रस्त भागामध्ये चालू असलेल्या पाण्याचे टॅंकर, रोजगार हमी योजनेबाबतची माहिती, दरड प्रणव क्षेत्रातील गावे, वाडया वस्त्यांचे पुनर्वसन, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई, संजय गांधी योजना, महास्वराज अभियान पेसा अंतर्गत गावांसाठी शिबिरे आदिंची माहिती यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रमा जोशी यांनी दिली.

पंचायत समिती अंतर्गत नविन विहीर, राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन, छोटे पाटबंधारे, घरकुल, ग्रामपंचायत पाणीपुरवठा, दिव्यांग कल्याण निधी, शरद ग्रामविकास योजना, जलजिवन मिशन, पशुवैदयकीय दवाखाने, पशुधन, खते, बि-बियाणे आदिंबाबतची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी दिली.विदयुत विभागाने गंजलेले खराब पोल बदलावे.घोडेगाव येथील हरिश्चंद्र महादेव मंदिर संस्थानचा “क” वर्गासाठी प्रस्ताव दयावा, सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त भागात तातडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समिती व तहसील कार्यालय ताबडतोब निर्णय घ्यावा. यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारची मदत केली जाईल.

- चंद्रकांत घोडेकर ,घोडेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com