
पुणे : कृषी विभागाने अनुदानित खत विक्रीसाठी ‘बायोमेट्रिक ई-पॉस’ यंत्रणेचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र, अनेक विक्रेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता अंमलबजावणीसाठी बुधवारपर्यंत (ता.२०) अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर संबंधितांना खत विक्री करण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याचा इशारा कृषी आयुक्तालयाने दिला आहे.