आंबेमोहोर तांदूळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; क्विंटलमागे १००० ते १५०० रुपये दर वाढ

किरकोळ बाजारात एक किलोचा दर ८५-९० रूपयांवर
Agriculture news Ambemohor rice increase of Rs1500 per quintal 90 rs per kg pune
Agriculture news Ambemohor rice increase of Rs1500 per quintal 90 rs per kg pune sakal

पुणे : तांदळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबेमोहोर तांदळाची परदेशातून वाढलेली मागणी आणि देशाअंतर्गत तुटवडा निर्माण झाल्यामुळे दर वाढले आहेत. बाजारात साधारणतः १००० ते १५०० रुपये क्विंटलने आंबेमोहोर तांदळाचे भाव वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात आंबेमोहर तांदळाचा एक किलोचा दर ८५-९० रूपयांवर पोहचला आहे.मागील दोन महिन्यात जून आणि जुलै मध्ये ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दरवाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात नविन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरवात होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८० टक्के तांदूळ हा मध्य प्रदेश मधून तर उर्वरित २० टक्के तांदूळ आंध्रप्रदेश या राज्यामधून येतो.

अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली. वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून आंबेमोहोर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे. आंबेमोहोर म्हणजेच विष्णुभोग तांदळाला लागणारा जास्त उत्पादन खर्च तसेच उत्पादन मिळण्यास लागणारा अधिकचा वेळ, कारण कोलम तांदूळ अडीच महिन्यात तर आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन येण्यास साडेतीन महिने इतका कालावधी लागतो यामुळे शेतकऱ्यांनी आंबेमोहोरचे उत्पादन कमी केले असल्याचे शहा यांनी सांगितले.

दर वाढीची करणे

- नॉन बासमती तांदळाची निर्यात वाढ

- अमेरिका व युरोप मधून आंबेमोहोर मोठी मागणी

- यंदा सौदी अरब व बांगलादेश या राष्ट्रांकडूनही मागणी

- भात उत्पादित क्षेत्रात उत्पादन कमी

- जास्तीच्या उत्पादनामुळे शेतकरी कोलमकडे वळाला

- जास्त उत्पादन खर्च आणि उत्पादन मिळण्यास अधिकचा वेळ

मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील शेतकरी आंबेमोहोरचा भात ३००० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकत होते. त्याचा दर शेतकऱ्यांनी ३५०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल केला आहे. परिणामी भाववाढ झाली आहे

- राजेश शहा, तांदळाचे व्यापारी, मार्केट यार्ड

आंबेमोहोर मध्य प्रदेशात “विष्णुभोग” नावाने प्रसिद्ध

तांदळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सुगंधी आंबेमोहोर हा तांदूळ मध्य प्रदेशात “विष्णुभोग” या नावाने प्रसिद्ध आहे. या तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये घेतले जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत आंबेमोहोरची लागवड कमी करून कोलम तांदळाची लागवड जास्त केली आहे.

तांदूळ आणि भाव (क्विंटलमध्ये)

  • तांदळाचा प्रकार - जानेवारी २०२२ - जुलै २०२२

  • आंबेमोहोर - ६००० ते ६५०० - ७००० ते ८०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com