Power Infrastructure Theft: भराडीतील घोडनदीकाठी दोन रोहित्र फोडून ४५० लिटर ऑइल चोरी; महावितरणचे दीड लाखांचे नुकसान

भराडीतील घोडनदीकाठी दोन रोहित्र फोडून ४५० लिटर ऑइल चोरी; महावितरणला दीड लाखांचे नुकसान, २५-३० शेतकऱ्यांचा वीजपुरवठा विस्कळीत
Infrastructure Sabotage: Two Transformers Destroyed in Massive Theft at Bharadi

Infrastructure Sabotage: Two Transformers Destroyed in Massive Theft at Bharadi

Sakal

Updated on

निरगुडसर : भराडी (ता.आंबेगाव) येथील घोडनदीच्या किनारी असलेल्या गावडेमळा जवळ दोन रोहित्र अज्ञात चोरट्यांनी मंगळवार (ता.१९) रोजी मध्यरात्री फोडली यामध्ये महावितरण कंपनीचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,ही चोरीची घटना बुधवार (ता.२०) रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. तसेच ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे कृषीपंप बंद झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे,तरी महावितरण कंपनीने तातडीने रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी भराडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com