esakal | कृषी मालाची गोदामे लुटली; मग पोलिसांनी...
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी मालाची गोदामे लुटली; मग पोलिसांनी...

- पाच आरोंपीना अटक, तीन गुन्हे उघडकीस.

- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी. 

कृषी मालाची गोदामे लुटली; मग पोलिसांनी...

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कृषी माल, खते व शालेय पोषण आहाराचा माल आसलेली गोदामे लुटणाऱ्या पाच जणांच्या अट्टल टोळीचा पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने इंदापूर तालुक्यातील बावडा येथून सोमवारी (ता. २७) मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांना अटक केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऋषीकेश किसन चव्हाण (वय २४ वर्षे, रा.लवंग ता.माळशिरस जि.सोलापूर) हा टोळीचा प्रमुख असून, पोलिसांनी ऋषीकेश चव्हाण याच्यासह संदिप जितेंद चव्हाण (वय २१ वर्षे), योगेश चांगदेव गुटाळ (वय २४ वर्षे रा. दोघेही, तांबवे ता. माळशिरस जि.सोलापूर), उज्वल धनंजय निंबाळकर (वय २० वर्षे,  रा. पंधारवाडी ता.इंदापूर) व विशाल सुरेश थोरात (वय २० वर्षे रा. रेडणी ता.इंदापूर) या पाच जनांना अटक केली आहे. अटक केलेल्या पाचही आरोंपीना वालचंदनगर, इंदापूर व टेंभुर्णी (जि. सोलापूर) या तिन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गोदामे लुटल्याची कबुली आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापुर-अकलुज रस्त्यावरील इंदापूर बाजार समितीच्या आवारातील एक खताचे गोदाम फोडुन, पधंरा दिवसापुर्वी अज्ञात चोरट्यांनी गोदामातील दीड लाख रुपये किंमतीचे खत चोरुन नेले होते. याबाबतचा तपास चालू असताना अशाच प्रकारे दहा दिवसांपूर्वी चोरट्यांनी पुन्हा एकदा इंदापूर बाजार समितीच्या आवारातील एका दुकानाचे दरवाजाचे तोडून खताच्या गोण्या चोरल्याची घटना उघडकीस आली होती. केवळ पाच दिवसाच्या अंतरात बाजार समितीच्या आवारातील दोन दुकाने फुटल्याने, वरील प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन  शाखेने सुरु केला होता. 

दरम्यान, वरील प्रकरणाचा तपास गोपनीयरित्या चालू असताना गोदाम लुटणारी एक टोळी सोमवारी रात्री एक बावडा परीसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दत्तात्रय गुंड यांच्यासह पोलिस कर्मचारी महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, गुरु गायकवाड, प्रविण मोरेल काशिनाथ राजापुरे यांनी बावडा परीसरात सोमवारी मध्यरात्री साफळा रचला होता. यात वरील पाचही जण अलगद सापडले.

ऋषीकेश चव्हाण व त्याच्या सहकाऱ्यांनी वालचंदनगर, इंदापूर व टेंभुर्णी (जि. सोलापूर) या तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी तीन गोदामे लुटल्याची कबुली आहे.