
पुणे : शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत जपतानाच गावातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा पुण्यात पंधरा ठिकाणी करण्यात येणार आहे. शासनाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या प्रयोगशाळांमुळे शेतकऱ्यांना मातीचे अचूक निदान गावातच मिळणार असून, तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळणार आहे.