
पुणे : पुणे महापालिकेने यंदा मिळकतकराची बिले १ मे पासून पाठवण्यास सुरुवात केली असली, तरी शहरातील १३ हजार ५९० मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात कर भरला असून, त्यांच्याकडून ४९ कोटी ०६ लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. यावर्षी कर वाढ न झाल्याने गेल्यावर्षीप्रमाणे ऑनलाइन मिळकतकर भरला आहे.