Ajit Pawar : बारामतीच्या अहिल्याबाई होळकर रुग्णालयाला 55 कोटींच्या 'या' प्रस्तावास मान्यता; अजितदादांनी केला पाठपुरावा

यामुळे कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना किरणोत्सर्गाची थेरपी बारामतीत शासकीय दरात मिळविता येणार आहे.
Punyashlok Ahilyabai Holkar Government Medical College
Punyashlok Ahilyabai Holkar Government Medical Collegeesakal
Updated on
Summary

बारामती पंचक्रोशीतील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यातून ही मान्यता मिळाली आहे.

बारामती : येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Punyashlok Ahilyabai Holkar Government Medical College) व सर्वोपचार रुग्णालय या संस्थेस राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने जारी केला आहे.

यामुळे कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना किरणोत्सर्गाची थेरपी बारामतीत शासकीय दरात मिळविता येणार आहे. बारामतीतील कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital) उभारणीच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. कर्करोग झालेल्या रुग्णांना या मुळे दिलासा मिळू शकेल.

Punyashlok Ahilyabai Holkar Government Medical College
Satara Police : 'पैशांचा पाऊस पाडून देतो'; आमिष दाखवून 36 लाख रुपये लुबाडणाऱ्या काका महाराजाला अटक, 'अंनिस'चीही आक्रमक भूमिका

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने जारी करणाऱ्या करण्यात आलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय या संस्थेस सन 2024-2025 या वित्तीय वर्षात राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून रुग्णसेवेकरिता रेडिओथेरेपी विभागात आवश्यक 55 कोटी 73 लाख रूपये किमतीची रेडिऐशन ऑनकोलॉजी युनिट विथ टर्न की ही यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाने 25 कोटी रुपयांचे एमआरआय मशीन खरेदी करण्याच्या प्रस्तावास देखील शासकीय मान्यता दिली आहे. यामुळे बारामती पंचक्रोशीतील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यातून ही मान्यता मिळाली आहे. सदर प्रशासकीय मान्यता 2024-2025 या आर्थिक वर्षात राज्य योजनेंतर्गत मंजूर तरतूदीमधून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyabai Holkar Karjmukti Yojana 2026 beneficiary list released for 3266 farmers in Junnar
Punyashlok Ahilyadevi Holkar farmer loan waiver scheme eKYC delay due to slow server and farmer ID issues in Palshi Sillod
Forgotten Scottish Tribute to Ahilyabai Holkar Revived After 177 Years
Malhar Rao Holkar's Reign Documented
Marathi News Esakal
www.esakal.com