जेजुरीत ५८ वर्षांनी भेटले माजी विद्यार्थी

जेजुरीत ५८ वर्षांनी भेटले माजी विद्यार्थी

Published on

जेजुरी, ता. २१ : जेजुरी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी विद्यालयातील सन १९६८-६९ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ५८ वर्षानंतर माजी विद्यार्थी
पुन्हा एकत्र आले होते.
ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष जयदीप बारभाई, जय मल्हार ज्येष्ट नागरिक संघटनेचे अध्यक्ष शामकाका पेशवे, नवनिर्वाचित
जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, नगरसेवक अस्लम पानसरे आदी उपस्थित होते. डॉ. नारायण टाक यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. जयदीप बारभाई व शामकाका पेशवे यांनी
शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.
ज्ञानोबा काळाणे, शिवाजी जगताप, प्रगती रोटे, सुरेश रासकर, साबळे सर, श्यामराव सोनवणे, मंदा बारभाई, दिलीप घोलप, सतेज राऊत यांची यावेळी भाषणे झाली. यानिमित्ताने शालेय
आठवणींना उजाळा मिळाला. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे अनुभव यावेळी सांगण्यात आले.
नारायण आगलावे यांनी पुढाकार घेऊन माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणले. चंद्रकांत झगडे, श्याम जगताप, अप्पा भंडारी, सदानंद आगलावे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com