

अहिल्यादेवी जयंती उत्सव मध्यवर्ती
महामंडळाची कमान महिलांच्या हाती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती महोत्सवाची कमान यंदा महिलांच्या हाती सोपविण्यात आली आहे. अध्यक्षपदासह सर्व पदाधिकारीपदी महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, मनीषा माने यांची अध्यक्षपदी तर किरण माशाळकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मध्यवर्ती जयंती महामंडळाची बैठक सोलापूर-पुणे रोडवरील हॉटेल सातबारा येथे नगरसेवक चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कार्याध्यक्षपदी किरण माशाळकर, उपाध्यक्षपदी शशीकला कसपटे व वैशाली सातपुते, खजिनदारपदी निमिषा वाघमोडे, सचिवपदी अर्जना बंडगर आणि सहसचिवपदी नीता बघेल यांची निवड केली आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे यांनी यंदाच्या वर्षी महामंडळाची सर्व सूत्रे महिलांच्या हाती देण्याची संकल्पना मांडली. या प्रस्तावाला सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत अध्यक्षांसह सर्व पदांवर महिलांची निवड केली.
नवीन पदाधिकाऱ्यांनी यंदाचा अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा देणारा ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात येईल, असे मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस सभागृहनेते नरेंद्र काळे, अर्जुन सलगर, देवेंद्र मदने, सुमन मुदलियार, गणेश नरोटे, शेखर बंगाळे, सागर पिसे, डी. डी. पांढरे, विनोद मोटे, राम वाकसे, राज बंडगर, उमेश कोळेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश गाडेकर यांनी केले, तर आभार मनोज सलगर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.