कऱ्हाड अहिल्यादेवी ट्रस्टचा कार्यक्रम

कऱ्हाड अहिल्यादेवी ट्रस्टचा कार्यक्रम
Published on

अहिल्यादेवी ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कऱ्हाड, ता. १० ः येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे झाला. यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार शंकर जगताप, रामहरी रुपनवर, प्रवीण काकडे, डॉ. एम. एम. शिकारे, नारायण गलांडे, डॉ. दीपाली सूर्यवंशी, सचिन बुरुंगले, डॉ. पंकज भिवटे, सुधीर वाघमोडे, सूर्यकांत गोफणे, मुकेश कारवा, राहुल कोळपे, अजय दुधभाते, उपस्थित होते.
यावेळी राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल रामराव वडकुते यांचा आमदार जगताप यांच्या हस्ते मानपत्र देऊन हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार वडकुत, आमदार जगताप यांच्यासह रामहरी रूपनवर यांची भाषण झाले. ॲड. विजयराव पाळेकर, सतीश बुरुंगले, डॉ. नानासाहेब राचकर, गजानन वाघमोडे, विजयराज पिसे, सुनील शेंडगे, डॉ. विजय झोरे, राजेश तांबे, प्रा. डॉ. विठोबा तळे, शंकर वीरकर, उल्हास वाघमोडे, रुक्मिणी गलांडे, सोमनाथ कर्णवर पाटील, अश्विनी शेंडगे, नवनाथ गोरड, दीपक राहिज, बापूसाहेब नरुटे, प्रवीण कोळपे, रतनबाई कोळपे व खंडू कोळपे आदींचा सत्कार झाला. प्रवीण काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. महावीर काळे यांनी आभार मानले, आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नारायण गलांडे, डॉ शिकारे, सुधीर वाघमोडे, डॉ. दीपाली सूर्यवंशी, डॉ. पंकज भिवटे यांची भाषणे झाली.

48271
पुणे ः कऱ्हाड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टतर्फे खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार करताना शंकर जगताप, या वेळी रामहरी रुपनवर, प्रवीण काकडे आदी.


----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com