

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना
राज्याबाहेर दौऱ्याची संधी
अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : शेतीविषयक अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना इतर राज्यांत जाऊन अभ्यास करण्याची संधी दिली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी तालुक्यांतील शेतकऱ्यांना कृषी विभागाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत फळपिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातही तरुण शेतकरी अधिक आहेत. त्यामुळे यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम राबविला जात आहे. यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, अहिल्यानगर, पाथर्डी तालुक्यांतील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्याबाहेर जाऊन अभ्यास करण्यासाठी दौरा करता येणार आहे.
फलोत्पादन शेतकऱ्यांना फलोत्पादनविषयक ज्ञान व कौशल्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, मोठ्या प्रक्रिया उद्योगांची कार्यपद्धती, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेचा अभ्यास, तसेच आधुनिक लागवड तंत्रज्ञान व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत शास्त्रोक्त माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या माध्यमातून फलोत्पादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया व विपणन व्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचा उपयोग उत्पादनाची गुणवत्ता व मूल्यवर्धनासाठी करता येणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नाव, गाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पिकाचा तपशील यासह संपूर्ण माहिती अचूक नमूद करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क करून २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.