फुटबॉल

फुटबॉल
Published on

PNE26W19433
अहिल्यानगर ः आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झालेले नगरचा संघ.

नगर ज्युनिअर बॉईज संघ धुळेला रवाना
आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा; उपांत्यपूर्व फेरीत

अहिल्यानगर, ता. १५ ः अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एडीएफए) यांच्या मान्यतेने अहिल्यानगर ज्युनिअर बॉईज (१५ वर्षे खालील) फुटबॉल संघ आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
ही स्पर्धा १२ ते १८ दरम्यान शिरपूर (जि. धुळे) येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी शुक्रवारी (ता.१५) संघ रवाना झाला. गतवर्षीच्या स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उल्लेखनीय कामगिरी करत चौथे स्थान पटकाविले होते. या कामगिरीवर यावर्षी संघ थेट उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीतून मोहिमेची सुरवात करणार आहे. अहिल्यानगर संघाचा सामना शनिवारी (ता.१६) सातारा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विजेत्या संघाविरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाचे अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, अमरजितसिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव व व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपाल सिंग परमार, सह खजिनदार रणबीर सिंग परमार, तसेच कोअर कमिटी सदस्य राजू पाटोळे यांनी अभिनंदन केले. संघाचे प्रशिक्षक जोनाथन जोसेफ, तर व्यवस्थापक जेव्हिअर स्वामी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.
------------
अहिल्यानगरचा संघ
अशोक चंद (कर्णधार), यदूवर कोकरे (उपकर्णधार), माहीर गुंदेचा, सौरभ खंडेलवाल, चिराग गोरे, ओम गाडे, ओम लोखंडे, इंद्रजित गायकवाड, कृष्णा भिसे, हर्षद सोनावणे, भार्गव पिंपळे, जय मुथा, गुणाध्य जाधव, आयुष्य गाडळकर, आदर्श साबळे, अंशुमन विधाते, देवांश झरेकर, मोक्ष गरदास, वीरेंद्र वीर, जोएल साठे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com