

साप्ताहिक समालोचन
अहिल्यानगर बाजारात टोमॅटो, कोबी, बटाट्याला मागणी कायम
--
भाजीपाल्याची दररोज १,८०० क्विंटलपर्यंत आवक; फळांची आवक मात्र घटली
--
सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटो, कोबी आणि बटाट्याला चांगली मागणी कायम राहिली. भाजीपाल्याची दररोज सुमारे १,७०० ते १,८०० क्विंटल आवक झाली, तर फळांची आवक घटून २२५ ते २५० क्विंटलांदरम्यान राहिल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
भाजीपाला विभागात बटाट्याची सर्वाधिक ५०५ क्विंटलपर्यंत आवक झाली. बटाट्याला प्रतिक्विंटल ६०० ते १,७०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २८० क्विंटल आवक होऊन ४०० ते ३,५०० रुपये दर मिळाला. कोबीची ११४ क्विंटल आवक झाली असून प्रतिक्विंटल ७०० ते ३,००० रुपये दर मिळाला.
फ्लॉवरची ६७ क्विंटल आवक होऊन १,५०० ते ६,००० रुपये, वांग्याची ४४ क्विंटल आवक होऊन ८०० ते ४,००० रुपये, काकडीची १०७ क्विंटल आवक होऊन ५०० ते ४,००० रुपये दर मिळाला.
गवारची २४ क्विंटल आवक होऊन १,००० ते ७,००० रुपये, दोडक्याची १६ क्विंटल आवक होऊन १,००० ते ७,००० रुपये, कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन २,००० ते ६,००० रुपये आणि घोसाळ्याची १४ क्विंटल आवक होऊन १,००० ते ४,५०० रुपये दर मिळाला.
भेंडीची ५६ क्विंटल आवक झाली असून तिला १,००० ते ५,००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची १२६ क्विंटल आवक होऊन १,००० ते ६,००० रुपये, शिमला मिरचीची ३४ क्विंटल आवक होऊन १,००० ते ५,००० रुपये, तर शेवग्याची ३७ क्विंटल आवक होऊन १,००० ते ६,५०० रुपये दर मिळाला.
लसणाची १८ क्विंटल आवक होऊन ६,००० ते १५,००० रुपये, आल्याची २३ क्विंटल आवक होऊन ५,००० ते १२,००० रुपये, तर ओल्या भुईमुगाच्या शेंगांची ४० क्विंटल आवक होऊन ४,००० ते ५,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
पालेभाज्यांमध्ये मेथीची दररोज २,८२५ जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्यांना २,००० ते ६,२०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १२,३६१ जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्यांना ३,००० ते ७,५०० रुपये दर मिळाला. शेपूच्या ५६८ जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्यांना २,००० ते ५,५०० रुपये दर मिळाला.
लिंबाची ४२ क्विंटल आवक झाली असून प्रतिक्विंटल ८०० ते ४,५०० रुपये दर मिळाला.
जांभळाला १२ हजारांपर्यंत दर
फळबाजारात दररोज २२५ ते २५० क्विंटल आवक होत आहे. जांभळाची २५ ते ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४,००० ते १२,००० रुपये दर मिळत आहे.
केशर आंब्याची पाच क्विंटल आवक होऊन ६,००० ते ११,००० रुपये, तोतापुरी आंब्याची ३० क्विंटल आवक होऊन २,००० ते २,५०० रुपये, तर बदाम आंब्याची २० क्विंटल आवक होऊन २,००० ते ५,००० रुपये दर मिळाला.
दशेरी आंब्याची १२ क्विंटल आवक होऊन ४,००० ते ६,००० रुपये दर मिळाला. पेरूची ६३ क्विंटल आवक होऊन १,००० ते ३,००० रुपये, मोसंबीची पाच क्विंटल आवक होऊन १,५०० ते ६,५०० रुपये, संत्र्याची दोन क्विंटल आवक होऊन २,००० ते ११,५०० रुपये दर मिळाला.
डाळिंबाची १४ क्विंटल आवक झाली असून प्रतिक्विंटल २,५०० ते २५,००० रुपये दर मिळाला. चिकूची दोन क्विंटल आवक होऊन १,२०० ते ४,००० रुपये, तर केळीची सहा क्विंटल आवक होऊन १,१०० ते १,६०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.