नगर ः अहिल्यानगर जिल्‍ह्यात सव्वा चार लाख मतदाराची माहिती मिळेना १६ ऑगस्टपर्यंत नावाची खात्री न झाल्यास नावे प्रशासन वगळणार

नगर ः अहिल्यानगर जिल्‍ह्यात सव्वा चार लाख मतदाराची माहिती मिळेना १६ ऑगस्टपर्यंत नावाची खात्री न झाल्यास नावे प्रशासन वगळणार
Published on

चार लाखांवर मतदारांची माहिती मिळेना
-----
अहिल्यानगर जिल्‍ह्यात १६ ऑगस्टपर्यंत नावाची खात्री न झाल्यास प्रशासन नावे वगळणार

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम पारनेर मतदारसंघ वगळता पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ३८ लाख मतदारांपैकी सुमारे ४ लाख २९ हजार ११२ मतदारांची माहिती मिळालेली नाही. या सर्व मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या सव्वा महिन्यांपासून १२ विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३८ लाख मतदारांपैकी सुमारे ४ लाख २९ हजार ११२ मतदार हे असंकलित आढळले. असंकलित यादीतील मतदार यांना त्यांच्या मतदार संघातील नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करता येईल. याशिवाय स्थानिक सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करता येईल. याशिवाय जिल्हास्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मतदारांची ग्रामीण व शहरी भागातील घर क्रमांकाची माहिती मागविण्याची कार्यवाही सुरू आहे. १६ आॅगस्टपर्यंत सबंधित मतदारांनी नावाची खात्री न झाल्यास मतदार यादीतून नावे वगळली जातील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. माहिती मिळत नसलेल्या मतदारात सर्वाधिक मतदार अहिल्यानगर शहरात असून त्यापाठोपाठ शेवगाव, श्रीगोंदे, शिर्डी, कोपरगाव मतदार संघाचा समावेश आहे.

मतदारसंघनिहाय वगळलेले मतदार
अकोले ः १६ हजार ३८८
संगमनेर ः २६ हजार ४८२
शिर्डी ः ३९ हजार ९७५
कोपरगाव ः ३८ हजार ९
श्रीरामपूर ः ३१ हजार ४२०
नेवासे ः २० हजार ४६१
शेवगाव ः ४१ हजार ५८३
राहुरी ः ३४ हजार ४२७
पारनेर ः ३८ हजार ४३२
अहिल्यानगर शहर ः ६९ हजार ७६६
श्रीगोंदे ः ४० हजार ६१०
कर्जत-जामखेड ः ३१ हजार ५५९
-----
मतदारांनी १६ ऑगस्टपर्यंत नावाची खात्री करावी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२६ या अर्हता तारखेवर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्‍यात आलेला आहे. त्‍यानुसार १७ ऑगस्ट अखेरपर्यंत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन गणना फॉर्म (ईएफ) जमा करणार आहेत. जिल्‍ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले आहे. त्‍यानुसार असंकलित मतदारांची यादी (गैरहजर, स्‍थलांतरित, मयत, दुबार) अहिल्‍यानगर जिल्‍ह्याचे संकेतस्‍थळ ahilyanagar.nic.in व https://ahilyanagar.maharashtra.gov.in/en/notice/special-intensive-revision-program-२०२६-asdd-voter-lists/ या लिंकद्वारे उपलब्‍ध होईल.
कोट ----
ही यादी संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्‍तरीय प्रतिनिधी (बीएलओ) यांच्याकडे देखील उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहे. प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या यादीचे अवलोकन करावे.
- डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com