नगर ःअहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या टंचाईच्या झळा १५५ टॅंकरने १५२ गावांसह ८७८ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा

नगर ःअहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या टंचाईच्या झळा १५५ टॅंकरने १५२ गावांसह ८७८ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा
Published on: 

अहिल्यानगर जिल्ह्यात
वाढत्या टंचाईच्या झळा

१५५ टॅंकरने १५२ गावांसह ८७८ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः जिल्ह्यात पाऊस नसल्याचे परिणाम दिसू लागले आहे. अजून पावसाळा संपलेला नसतानाच जिल्ह्यात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण होत असून जिल्ह्यात सध्या १५५ टॅंकरने १५२ गावांसह ८७८ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळी पट्टा असलेल्या पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ६९ टँकर सुरू आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पाऊस झाला नाही. पावसाळ्याचे चार महिने उलटले असले तरी अकोल्यातील घाटमाथ्याचा परिसर वगळता कोणत्याही भागात पाणी वाहिले असा पाऊस झाला नाही. पावसाचा मोठा खंड पडल्याने खरिपाची सर्व पिके जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत वाया गेली आहेत. आता आक्टोबर हिटच्या उन्हाचा पारा वाढत असताना पाऊस नसल्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. प्रामुख्याने दुष्काळी पट्टा असलेल्या अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत तालुक्यांत अधिक तीव्रतेने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आताच जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील तीन लाख लोकसंख्येला १५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये १५२ गावांसह ८७८ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे.
शासनाने जिल्ह्यातील सर्वच १४ तालुक्यांचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पिकांच्या नुकसानीच्या समस्येपाठोपाठ आता जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या वेगाने वाढत आहे. सध्या पाथर्डी तालुक्यातील ५६ गावांमध्ये सर्वाधिक ६९ टॅंकरद्वारे १ लाख २७ हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ कर्जत तालुक्यातील २५ गावांना २१ टॅंकरद्वारे ४२ हजार नागरिकांना, शेवगाव तालुक्यातील २८ गावांना २० टॅंकरद्वारे ४५ हजार नागरिकांना, तर नगर तालुक्यातील १९ गावांमध्ये १९ टॅंकरद्वारे ४३ हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. जामखेडमध्ये ८, संगमनेरमध्ये ७, पारनेर ५, श्रीगोंदे ४, तर नेवासे तालुक्यात २ टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

चौकट -----
सरासरी ६६ टक्के पाऊस
अहिल्यानगर जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान ४४८ मिलिमीटरपैकी २९९ मिमी म्हणजेच ६६.७ टक्के सरासरी पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण १४७ पैकी केवळ ४५ मिलिमीटर म्हणजेच ३०.६ टक्के सरासरी पाऊस पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com