नगर- जिल्हा सहकारी बॅकेत थोरात-विखे यांच्या पॅनलचे वर्चस्व, लंकेचाही विजय

नगर- जिल्हा सहकारी बॅकेत थोरात-विखे यांच्या पॅनलचे वर्चस्व, लंकेचाही विजय
Published on: 

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत
थोरात-विखे पॅनेलला १८ जागा

नीलेश लंके विजयी; राम शिंदे गटाला दोन जागा

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी थोरात-विखे यांच्या पॅनेलला १८ जागा मिळाल्या. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या. सर्वाधिक चर्चेतील आणि जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेरमधून दणदणीत विजय मिळवत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रवेश केला आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत प्रयत्न केले. परंतु, विश्वासात घेतले नसल्याचे सांगत थोरात-विखे यांच्या पॅनेलच्या विरोधात भूमिका घेतली. अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत सोसायटी मतदारसंघातील १० व बिगरशेती मतदारसंघातील एक अशा ११ जागा बिनविरोध झाल्या. १० जागांसाठी सोमवारी (ता. २) मतदान झाले. मंगळवारी (ता. ३) मतमोजणी झाली. दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आठ जागा थोरात-विखे यांच्या पॅनेलला मिळाल्या. एका जागेवर लंके निवडून आले, तर दोन जागा राम शिंदे गटाला मिळाल्या आहेत. महिला राखीव गटात शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांनी जोरदार टक्कर दिली. अकोल्यात आमदार किरण लटामटे, तसेच भाजप नेते जालिंदर वाकचौरे आणि राहुरीतून सत्यजित कदम यांचा पराभव झाला. विजयानंतर संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

जिल्हा बँकेचे नूतन संचालक
बिनविरोध संचालक ः आमदार मोनिका राजळे (पाथर्डी), बिपान कोल्हे (कोपरगाव), आमदार अक्षय कर्डिले (अहिल्यानगर), डॉ. सुजय विखे पाटील (राहाता), रणजित देशमुख (संगमनेर), माजी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), राजश्री घुले (शेवगाव), करण ससाणे (श्रीरामपूर), सुधीर घुमरे (जामखेड), दत्ता पानसरे (श्रीगोंदा), खासदार नीलेश लंके (पारनेर), अकोले ः संजीवनी गायकर-शिंदे (अकोले), आमदार प्राजक्त तनपुरे (राहुरी), कर्जत ः ज्योती शिंदे (कर्जत), बिगरशेती मतदारसंघ ः सचिन जगताप, शेतीपूरक मतदारसंघ ः आमदार आशुतोष काळे, महिला राखीव प्रतिनिधी ः अनुराधा नागवडे व संगीता वाघ, वि.जा.भ.ज. विशेष मागास प्रवर्ग ः गणपतराव सांगळे, अनुसूचित जाती-जमाती ः माजी आमदार वैभव पिचड, इतर मागास प्रवर्ग ः कारभारी जावळे (विजयी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.