नगर- रब्बीची सव्वीस हजार हेक्टरवर पेरणी

नगर- रब्बीची सव्वीस हजार हेक्टरवर पेरणी
Published on: 

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा
रब्बीत ज्वारी पेरणीच अधिक

आतापर्यंत केवळ सव्वीस हजार आठशे हेक्टरवर पेरणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः जिल्‍ह्यात परतीचा पाऊस झाला नाही. पाणीही उपलब्ध नाही याचे रब्बीवर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. रब्बी पेरणीचा कालावधी संपत आलेला असताना आतापर्यंत केवळ २६ हजार ८७१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यंदा आतापर्यंतची स्थिती पाहता ज्वारी पेरणीला अधिक असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने ज्वारीचे बियाणे अनुदानावर उपलब्ध केले असून यंदा ज्वारीकडे कल असल्याचे दिसून येत आहे, असे कृषी विभागातून सांगितले जात आहे.
जिल्ह्यात यंदा रब्बीत ५ लाख ५४ हजार ०८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असे गृहीत धरून कृषी विभागाने खते व बियाणे उपलब्ध करण्याबाबत नियोजन केले होते. मात्र यंदा पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. परतीचाही पाऊस झाला नाही. त्याचा गंभीर परिणाम रब्बी पेरणीवर झाला आहे. यंदा आतापर्यंत केवळ २६ हजार ८७१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झालीय. रब्बीतील ज्वारी पेरणी साधारण १५ आॅक्टोबरपर्यंत उरकत असते. यंदा कृषी विभागाने १ लाख ४७ हजार ९०९ हेक्टरवर ज्वारी पेरली जाईल असे गृहीत धरले होते. मात्र आतापर्यंत केवळ २१ हजार ८०६ हेक्टरवर पेरणी झालीय, त्यातही १८ हजार हेक्टरवर जामखेड तालुक्यात पेरणी झाली आहे. मकाची ३ हजार हेक्टरवर तर गव्हाची अवघी ११५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची परणी १७८८ हेक्टरवर झाली आहे.
जिल्‍ह्यातील काही तालुक्यांतील नदीपट्टा, धरणाच्या पाण्याची आशा आणि पाणी उपलब्धतेचा भाग सोडला तर बहुतांश भागात दुष्काळीची तीव्रता अधिक आहे. आताच बऱ्याच ठिकाणी पाणी टॅंकरने पुरवले जात आहे. जेथे थोडेफार पाणी आहे, तेथे अन्य पिके घेण्यापेक्षा ज्वारी पेरली तर पीक आले नाही तरी जनावरांना चारा तरी होईल, या आशेने ज्वारीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)
अहिल्यानगर ः ३२०२
अकोले ः३१७
जामखेड ः १७९७६
कर्जत ः ४८९
कोपरगाव ः ४७८
नेवासा ःः १००
पारनेर ः २६४२
राहाता ः ४३७
राहुरी ः ७८
संगमनेर ः ५३३
शेवगाव ः १११
श्रीगोंदा ः ३८५
श्रीरामपूर ः १२०
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.