रेल्वे आरक्षणाची वेळ कमी करण्यास विरोध

रेल्वे आरक्षणाची वेळ कमी करण्यास विरोध
Published on

बीड-पुणे रेल्वेच्या वेळेत बदल करा ः वधवा

अहिल्यानगर, ता. १६ ः रेल्वे स्थानकातील इंटरनेट वेगाअभावी आरक्षण प्रक्रिया मंदावली आहे. बीड रेल्वेसाठी कर्मचारी कपात केल्यास सुविधांवर अतिरिक्त तणाव येणार आहे. आरक्षण तिकीट खिडकीची वेळ पूर्वीप्रमाणे रात्री ८ वाजेपर्यंत ठेवावी. बीड-पुणे रेल्वे सकाळी अहिल्यानगर स्थानकातून सोडावी, अशी मागणी अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे असोसिएशनचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी केली आहे.
अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकीची वेळ कमी करण्याचा निर्णय हा असोसिएशनच्या नाराजीचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी आरक्षण तिकीट खिडकी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती. आता ही सुविधा सकाळी ८ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच उपलब्ध राहणार आहे. यामुळे नोकरदार, औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, व्यापारी, संरक्षण दलातील जवान, तसेच दिवसभर कामानिमित्त बाहेर असणाऱ्या प्रवाशांना आरक्षणासाठी अडचणी येण्याची शक्यता असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुणे-बीड एक्स्प्रेस पुणे येथून रात्री १०.४५ वाजता सुटून अहिल्यानगर येथे रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान पोहोचणार आहे. सकाळी ६ वाजता बीडला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात बीड-पुणे एक्स्प्रेस रात्री साडेनऊ वाजता बीडहून सुटून मध्यरात्रीनंतर एक वाजता अहिल्यानगरला येणार आहे. पहाटे साडेपाच वाजता पुण्यात पोहोचणार आहे. या वेळापत्रकामुळे अहिल्यानगरकरांची सकाळच्या वेळेत पुण्यात पोहोचणारी आणि संध्याकाळी पुण्याहून परतणारी इंटरसिटी रेल्वेची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नसल्याची भूमिका असोसिएशनने व्यक्त केली आहे.
अहिल्यानगरहून पुण्याकडे जाणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, तसेच नियमित प्रवाशांसाठी सकाळी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अशोक कानडे, प्रशांत मुनोत, संजय सपकाळ, अर्शद शेख, सुनील छाजेड, विपुल शहा, संजय वाळुंज, सुनील थोरात, संतोष बडे आदी सदस्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com