

अहिल्यानगर जिल्ह्यात तीनशे टॅंकरने पाणी पुरवठा
२५९ गावे आणि १ हजार ५६३ वाड्यांत पाणी टंचाई
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील २५९ गावे आणि १ हजार ५६३ वाड्यांना तब्बल २९८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५ लाख २८ हजार १६३ नागरिकांची तहान भागविली जात आहे. यंदा जनावरांनाही टॅंकरने पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात पाऊस नसल्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहे. सर्वाधिक झळा दक्षिण जिल्ह्यातील तसेच शास्वत आणि धरण अथवा कालव्याचे पाणी नसलेल्या पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर तालुक्यातील काही भागाला बसत आहे. एकट्या पाथर्डी तालुक्यात सुमारे पावणे दोन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. कर्जत तालुक्यात ७८ हजार ७४४ नागरिकांना, ६७ हजार ५९४ नागरिकांना, शेवगाव तालुक्यात ६७ हजार ९६ नागरिकांना, जामखेड तालुक्यात ३९ हजार ११६ नागरिकांना, पारनेरमध्ये ४१ हजार ४०४ नागरिकांना, संगमनेर तालुक्यात २० हजार २६४ नागरिकांना, श्रीगोंदा तालुक्यात १४ हजार २६३ नागरिकांना, नेवासा तालुक्यात ५ हजार ४९८ नागरिकांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
शेवगाव, कर्जत, पाथर्डी आणि पारनेर या शहरांमध्येही टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पारनेर शहर आणि लगतचे १३ हजार ११९ नागरिकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. पाथर्डी शहर व परिसरातील २५ वाड्यांसाठी तीन टँकरव्दारे सुमारे पाच हजार नागरिकांना पाणी दिले जात आहे. कर्जत शहर आणि लगतच्या १९ वाड्यांतील ५ हजार ४०० नागरिकांना आहेत. तर शेवगाव शहर व परिसरातील १७ वाड्यांतील २ हजार ६३० नागरिकांची तहान पाच टँकरव्दारे भागविली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून ३७ विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
--------
सुरु असलेल्या टॅंकरची संख्या
- पाथर्डी : १०० (७८ गावे ४६५ वाड्या)
- कर्जत : ३९ (४४ गावे ३०९ वाड्या)
- अहिल्यानगर : ३५ (३१ गावे १८२ वाड्या)
- शेवगाव : ४१ (३९ गावे २२७ वाड्या)
- जामखेड : ३१ (२८ गावे ५२ वाड्या)
- पारनेर : १९ (१५ गावे १५४ वाड्या)
- संगमनेर : १३ (१३ गावे २२ वाड्या)
- श्रीगोंदा : ५ (पाच गावे ५९ वाड्या)
- नेवासा : २ (३ गावे १९ वाड्या)
- पारनेर शहर : १३ ( शहर व ३० वाड्या)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.