हेड ‘एआय’ एजंटवरील नियंत्रण सुटले

हेड
‘एआय’ एजंटवरील नियंत्रण सुटले
Published on: 

न्यूयॉर्क, ता.१० (वृत्तसंस्था) ः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता माणसाच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागली असून एआय एजंट हे अन्य संस्थांच्या प्रणालीमध्ये बेकायदा घुसखोरी करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘ओपनएआय’ने शंभरपेक्षाही अधिक संस्था आणि संघटनांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. या एजंट्सनी प्रणालीमध्ये नेमकी किती खोलवर घुसखोरी केली आहे, याचा शोध घेण्यासाठी कंपनीकडून ५० पेटाबाईट एवढा डेटा पडताळून पाहिला जात आहे.
अनेक बड्या कंपन्या या शक्तिशाली एआय मॉडेलची निर्मिती करू लागल्या असून मागील महिन्यात यातील काही एजंटनी प्रणालीमध्ये घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. अशा प्रकारच्या समस्या या पुन्हा भेडसावू नयेत म्हणून आम्ही प्रभावी उपाययोजना आखत आहोत, असे ‘ओपनएआय’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या डेटाचा पूर्ण आढावा घेण्यासाठी साधारणपणे एका महिनाभराचा कालावधी लागू शकतो.

अनेक संस्थांना चुकीचे निर्देश
कंपनीने केलेल्या पडताळणीमध्ये एआय एजंटनी अनेक संकेतस्थळांना चुकीचे निर्देश दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हे एआय मॉडेल नियंत्रणाच्याबाहेर जाऊ नयेत म्हणून कंपनीने आधीच उपाय आखले होते पण तेही निष्फळ ठरले. संबंधित संस्थांना डेटा देण्यात आला असून यामाध्यमातून त्यांना सुरक्षा प्रणालीमध्ये एआय एजंटने केलेल्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.


अत्याधुनिक जीपीयूचा वापर
सध्या ओपनएआय ही कंपनी जवळपास ५० पेटाबाईट एवढ्या डेटाचे रेकॉर्ड तपासत असून त्यासाठी तब्बल सात हजार अत्याधुनिक ‘जीबी-२००’ आणि ‘जीबी-३००’ जीपीयू बसविण्यात आले आहेत. या सगळ्या प्रक्रियेवर दररोज पाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हा सगळा डेटा सामान्य इंग्रजी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला असेल तर त्याचे वाचन पूर्ण करण्यासाठी सहा कोटी एवढी वर्षे लागू शकतात, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com