

AI in Education should empower students to think critically rather than replace human intelligence.
Sakal
पुणे : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे आता भविष्य राहिलेले नसून ते वर्तमान बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयला केवळ तयार उत्तरे देणारे साधन न समजता, स्वतःच्या विचारशक्तीला अधिक सक्षम करणारा सहकारी म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. जर आपण एआयवर विसंबून राहून स्वतः विचार करणे थांबवले, तर मानवी बुद्धिमत्ता कमकुवत होईल. म्हणूनच, या बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) चीफ मेंटॉर विवेक सावंत यांनी केले.