दहिवडी कॉलेजमध्ये आज ''कृत्रिम बुध्दिमत्ता'' या विषयावर राष्ट्रीय परिषद
दहिवडी कॉलेजमध्ये आज
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’वर परिषद
दहिवडी, ता. १३ : येथील दहिवडी कॉलेज येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने उद्या (शनिवार) ‘कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण : नवकल्पना, आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
ही परिषद शिक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, संधी व आव्हाने यावर आधारित आहे. रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांची उपस्थिती राहील. परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तारसाडिया विद्यापीठातील प्रा. डॉ. जयमिन रे हे ‘शिक्षकांसाठी कौशल्य विकास व पुढील पिढीतील नेतृत्व घडविण्यात एआयची भूमिका’ या विषयावर व्याख्यान देतील. केबीपी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. गणेश दांगट हे ‘विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रातील एआय’ या विषयावर मार्गदर्शन करतील. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. किरण देवडे हे ‘शिक्षणातील एआय : धोरण, नैतिकता व भविष्यातील दिशा’ या विषयावर विचार मांडतील. जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. रोहन ढब्बे हे ‘शिक्षण क्षेत्रातील एआय साधने’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी अधिकाधिक शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

