
पुणे : "आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) सध्या संशोधन, कला, मनोरंजनापासून ते उद्योग, व्यवसायामध्ये सर्रासपणे वापर होऊ लागला आहे. त्याद्वारे अनेक प्रश्न सहजपणे सोडविणे शक्य झाले आहे. "एआय' तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात पुढे येत असले तरी नावीन्य व सर्जनशीलतेच्या क्षेत्रात मानवी बुद्धिमत्तेशिवाय पर्याय असणार नाही.' असे "एआय' तज्ज्ञ अजित जगताप यांनी शुक्रवारी व्यक्त केले.