उंडाळे. एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उसाचे एकरी 150 ते200 टन उत्पादन शक्य
एआयद्वारे एकरी २०० टन ऊस उत्पादन शक्य
डॉ. भोईटे; उंडाळेत परिसंवाद, शेतकरी-सभासद मेळावा
उंडाळे, ता. ५ ः एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उसाचे एकरी १५० ते २०० टनापर्यंत उत्पादन घेणे शक्य असल्याचे मत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी व्यक्त केले.
येथील स्वातंत्र्यसैनिक (कै.) शामराव पाटील यांच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस परिसंवाद, शेतकरी व सभासद मेळाव्यात डॉ. भोईटे बोलत होते. कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, आदिराज पाटील, शहाजी शेवाळे आदी उपस्थित होते.
डॉ. भोईटे म्हणाले, ‘‘बदलते हवामान, जमिनीचा खालावलेला पोत आणि पाण्याची टंचाई या समस्यांवर मात करण्यासाठी भविष्यात एआयवर आधारित शेतीशिवाय पर्याय नाही. गेल्या पाच वर्षांपासून बारामती कृषी विज्ञान केंद्र ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व इतर नामांकित कंपन्यांच्या सहकार्याने शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहे.’’
श्रीमंत पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीची कास सोडून आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन वाढवावे. एआयच्या अचूकतेमुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ होणार आहे.’’
ॲड. पाटील - उंडाळकर म्हणाले, ‘‘ऊस हे नगदी पीक असून, उत्पादनवाढीसाठी एआयचा कसा उपयोग होतो, हे समजावून सांगण्यासाठीच हा परिसंवाद आयोजित केला आहे.’’
प्रा. धनाजी काटकर यांचे भाषण झाले. जिल्हा बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी बँकेच्या विविध कर्ज व अनुदान योजनांची माहिती दिली.
या वेळी सिद्धनाथ घराळ, के. टी. पाटील, लक्ष्मण देसाई, सतीश इगवंले, अनिल मोहिते, शिवाजीराव जाधव, हणमंतराव चव्हाण, रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते. ब. ल. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिलीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धनाथ घराळ यांनी आभार मानले.
A00773
उंडाळे ः परिसंवादात बोलताना डॉ. विवेक भोईटे. त्या वेळी ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, श्रीमंत पाटील आदी.
................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

