

पुणे ः पूर्वी नाटक म्हटले की रंगमंचावर नट सादरीकरण करत असताना पिटात बसलेल्या प्रकाशयोजनाकाराची त्यांच्यावर खिळलेली नजर आणि लाइटच्या बोर्डवर वेगवेगळ्या प्रसंगानुसार प्रकाशयोजना बदलण्यासाठी सराईतपणे फिरणारी बोटे, हे ठरलेले दृश्य, पण आता केवळ लॅपटॉपचे एक बटण दाबून प्रकाशयोजनाकार निवांत बसू शकतो आणि तरी प्रसंगाबरहुकूम प्रकाशयोजना बदलते, असे सांगितले तर...?