
गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या दुर्दैवी घटनेत पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथील संत तुकाराम नगर परिसरातील 22 वर्षीय इरफान समीर शेख याच्यासह 265 जणांचा मृत्यू झाला. इरफान हा एअर इंडियाचा केबिन क्रू मेंबर होता आणि त्याच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.