कालठणमधून होणार हवाई वाहतूक

जलसंपदा, पर्यावरण तसेच एअर कंट्रोल विभागाची मान्यता मिळाल्यानंतर हे काम होणार आहे.
pune
punesakal

इंदापूर : कालठण गावी भीमानदीच्या तीरावर जल हवाई वाहतुकीसाठी छोटे बंदर उभारणीचा प्रस्ताव नागरी हवाई मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. जलसंपदा, पर्यावरण तसेच एअर कंट्रोल विभागाची मान्यता मिळाल्यानंतर हे काम होणार आहे.

इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘उजनी जलाशय ते खडकवासला जलाशय’ अशी जल हवाई वाहतूक सुरू करण्यासंदर्भातील बातमी ‘सकाळ’ ने २ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘केवडिया ते अहमदाबाद’ सी प्लेनच्या धर्तीवर उजनी ते खडकवासला जल हवाई वाहतूक सुरू करता येईल का, याची पाहणी करण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेस दिल्या होत्या. त्यानुसार कुंभारगाव भिगवण, कांदलगाव व कालठण ही ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. मात्र कुंभारगाव भिगवण येथे पक्षी येत असल्याने तसेच कांदलगाव धरणाजवळ असल्याने ही दोन्ही ठिकाणे रद्द झाली.

pune
पाऊस पुन्हा सक्रीय होणार, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार!

कालठण येथे पाणी पातळी खोल राहत असल्याने जल हवाई वाहतूक करणे सोपे असल्याने या गावचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तालुक्याच्या अर्थकारणास चालना मिळणारआहे. दरम्यान, कालठण १ च्या वतीने हनुमंत जाधव तर २ च्या वतीने ॲड. भारत जगताप यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. तर उजनी जलहवाई वाहतुकीची सर्वप्रथम मागणी केल्याचे अतुल तेरखेडकर यांनी म्हटले आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात गंगावळण येथे पर्यटन केंद्र मंजूर झाले असून जल हवाई वाहतुकीमुळे त्यास चालना मिळेल, असे महारुद्र पाटील यांनी सांगितले.

pune
नाशिकमध्ये सामाजिक उपक्रमांतून यिनचा 7 वा वर्धापनदिन साजरा

तज्ज्ञांकडून पाहणी

यासंदर्भात उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे म्हणाले, ‘‘पुणे जिल्हा परिषदेने खासगी तज्ज्ञ लोकांकडून उजनीकाठाची पाहणी केली आहे. धरण सुरक्षेस आमचे प्राधान्य आहे. सर्वांगीण विचार करूनच या प्रकल्पास ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com