Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणारा कल्याणीनगर ते पुणे विमानतळ हा नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला.
Pune Metro

Pune Metro

sakal

Updated on

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणारा कल्याणीनगर ते पुणे विमानतळ हा नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला आहे, तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याची सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com