
पुणे - प्रवाशांना घेण्यासाठी अथवा सोडण्यासाठी येणाऱ्या खासगी वाहनचालकांना पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर जास्त वेळ थांबणे महागात पडू शकते. विमानतळ प्रशासन महिनाभरात वेळेची मर्यादा लागू करणार आहे. जास्त वेळ थांबायचे असल्यास चालकाला दंडाच्या स्वरूपात अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.