

Pune Airport
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - पुणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये वाहनचालकांना प्रवाशांची वाट पाहत थांबणे आता महागात पडू शकते. विमानतळ प्रशासन थांबा कालावधीचा नियम लागू करीत आहे. यात सुमारे १२ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी टर्मिनलमध्ये ‘एनपीआर’ (नंबर प्लेट रेकग्निशन) कॅमेरे बसविले जात आहेत.