दादांची दूरदृष्टी
दादांची दूरदृष्टी
- शिवाजीराव कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
अजितदादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संस्थेच्या शाळांच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले. संस्थेची पहिली शाळा नसरापूर येथील श्री शिवाजी विद्यालयाची इमारतदेखील नव्याने बांधण्यात आली. या शाळेशेजारीच संस्थेचे शंकरराव भेलके महाविद्यालय आहे. त्याची इमारतदेखील सुसज्ज बांधण्याचे आदेश अजितदादांनी दिले होते. ठेकेदाराने काम करताना महाविद्यालयाची जुनी इमारत न पाडता मागे तशीच ठेऊन त्या इमारतीपुढे नव्याने मोठी इमारत बांधली. या दरम्यान दौऱ्यानिमित्त अजितदादा नसरापूर येथे आले असताना त्यांनी संस्थेच्या नव्याने बांधलेल्या इमारती पाहण्यासाठी गेले. विद्यालयाची इमारत मागे सरकून व्यवस्थित बांधलेली दिसली, मात्र महाविद्यालयाची इमारत पुढे आलेली दिसल्यावर त्यांनी ठेकेदाराला समोर बोलावून असे का विचारले? त्यावर ठेकेदाराने मागे जुनी इमारत असल्याने ही इमारत पुढे सरकून बांधल्याचे सांगितल्यावर अजितदादा ठेकेदारावर चिडले आणि म्हणाले, ‘‘शाळा- महाविद्यालयांना क्रीडांगण मैदान मोठे असणे आवश्यक असते, तुम्ही जुनी इमारत ठेऊन नविन इमारत पुढे सरकून बांधल्याने क्रीडांगणाची जागा कमी झाली आहे, हे योग्य नाही. जुनी इमारत पाडणे आवश्यक होते.’’ विद्यार्थी व क्रीडांगण याबद्दल दादांना किती दूरदृष्टी होती, त्या प्रसंगावरून समजले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

