Ajit Pawar: "काहींनी 38व्या वर्षीच वसंत दादांना बाजूला सारलं अन् मी..."; अजित पवारांचा पुन्हा नाव न घेता शरद पवारांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची स्तुती केली.
Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar: बारामती: माझ्यामागे आज 43 विधानसभेतील, दोन अपक्ष व विधानपरिषदेतील सहा आमदार उभे राहतात, याचा अर्थ माझी भूमिका या सर्वांना पटल्यानेच हे शक्य झाले आहे. मी साठीत ही भूमिका घेतली काहींनी वयाच्या अडोतिसाव्या वर्षीच घेतली होती. वरिष्ठांनी आता मार्गदर्शन करावे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची स्तुती केली.  

नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांच्या सत्कार सोहळ्यात अजित पवार बोलत होते.  ज्यांना माझ्यासोबत झोकून देऊन काम करायचे आहे त्यांनी माझ्याकडे या, ज्यांना दुसऱ्या गटात जायचे आहे त्यांनी खुशाला जावे पण आता कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे स्पष्ट करत भविष्यात शरद पवार गटाविरुध्द आपण उभे ठाकणार असल्याचेच संकेत अजित पवार यांनी दिले.

अजित पवार म्हणाले, मी भूमिका साठी पार झाल्यावर घेतली. काहींनी तर ३८ व्या वर्षी घेतली. वसंतदादांना डावलून निर्णय घेतला गेला, म्हणजे यापूर्वी निर्णय घेतले नाहीत, असं नाही. त्यामुळे तुम्ही पण मला समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाचा काळ असतो, जास्त वय झाल्यावर आपणही घरातल्यांना म्हणतो तुम्ही आराम करा, आशिर्वाद द्या, मार्गदर्शन करा, असेही त्यांनी नाव न घेता शरद पवार यांना म्हटले.

मी जी भूमिका घेईल ती कायम बारामतीकरांच्या हिताचीच असेल. ज्या दिवशी बारामतीचे हित जोपासले जात नाही, असे लक्षात येईल त्या दिवशी अजित पवार वेगळी भूमिका निश्चितपणे घेईल. देशापुढे आज नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे कणखर नेतृत्व दिसत नाही, असे पवार म्हणाले. नवीन भूमिका घेतल्यानंतर आता इकडे मग तिकडे, असे या पुढील काळात चालणार नाही, असे देखील अजित पवारांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Aarogya Bharti 2023 : आरोग्य विभागाच्या पदभरतीवर प्रश्नचिन्ह; उमेदवारांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफांची भेट

अजित पवार म्हणाले, आज मी सत्तेत आहे. माझे नरेंद्र मोदी, अमित शहांसोबत संबंध चांगले आहेत. याच्या आधी मी सतत मागे असायचो, वडीलधारी नेत्यांनी सगळं पहावे, अशी मी भूमिका घ्यायचो. परंतु ही भूमिका घेतल्यानंतर आता मोठ्या लोकांशी माझे संबंध यायला लागले, त्यांना मी जे काम सांगतो ते दोघेही करतात, इथेनॉलच्या प्रश्नावर त्यांनी थोडाफार मार्ग काढला, मी त्यासाठी दिल्लीला जाणार त्यांना भेटणार, त्या शिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर त्यांना भेटणार.

आज देशपातळीवर अनेक दिग्गज नेते आहेत, पण नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कणखर नेतृत्व दुसरे दिसत नाही. इंडिया आघाडीचे नेतृत्व म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आल्याचा उल्लेख करुन ते नरेंद्र मोदी व खर्गे यांना उभे केले तर तुम्ही भारतीय नागरिक म्हणून कुणाला निवडून द्याल. जागतिक पातळीवर भारताचे नाव मोदी यांच्यामुळेच झालेले आहे. आज आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून मोठे प्रकल्प आणत आहोत, असे पवारांनी सांगितले.

Ajit Pawar
Mumbai Crime News : मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात गोळीबार, तीन जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com