Ajit Pawar : काही कलमांमध्ये बदल म्हणजे घटना बदलली असं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

मी स्वतः शेतकरी आहे. मला शेती करायचा नाद आहे, दुसरा कुठला नाद नाही. पंडित नेहरू पासून ते आत्तापर्यंत अनेकांनी घटनेतील काही कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
Ajit Pawar answer to opposition change in some clauses does not mean that constitution has changed
Ajit Pawar answer to opposition change in some clauses does not mean that constitution has changed Sakal

उरुळी कांचन : २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३५ हजार हजार रुपयाची कर्जमाफी केली, त्यानंतर सत्तेत आम्ही असताना २७ हजार कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहोत.

मी स्वतः शेतकरी आहे. मला शेती करायचा नाद आहे, दुसरा कुठला नाद नाही. पंडित नेहरू पासून ते आत्तापर्यंत अनेकांनी घटनेतील काही कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे घटना बदलली असे होत नाही.

काँग्रेसने मागासवर्गीय लोकांचा विकास केला नाही, त्यांचा स्वतः बाबासाहेब आंबेडकर असतानाही अंतर्गत नेहमीच विरोध केला, संविधान बदलण्याची खोटी अफवा पसरवली जात आहे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदीप कंद, अपूर्व आढळराव पाटील, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक, बुध कमिटी सदस्य उपस्थित होते. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणले,

जो माणूस खिशात असलेले पैसे खर्च करू शकत नाही तो केंद्रातले पैसे कसे आणू शकेल, त्यामुळे आपल्याला अधिक विकास कामे करण्याकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचे आहे.

त्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्यावे. पंधरा वर्षे मी खासदार असताना, ड्रीम प्रकल्प केले होते, पुणे नाशिक हायवे याचा मार्ग सुद्धा मीच निर्माण केला होता. त्यासोबत लोणी काळभोर येथील सोळाशे कोटीचा पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

अजित पवार

- परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो मेट्रो, रिंग रोड,अंतर्गत रस्ते पुणे नाशिक व पुणे सोलापूर रोडचा विकास करणार

- केंद्रात अमित शहा यांच्याकडेच सहकार खाते

- चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून द्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com